Ticker

6/recent/ticker-posts

ट्रॅक्टरवरील ताबा सुटला, अन.. उलटला त्याखाली दबून चालकाचा मृत्यु



संदीप राठोड 

खामगांव तालुक्यातील लाखनवाडा जयरामगड रोडवर लाखणवड्या जवळील नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला . ट्रॅक्टर चालक संतोष गवई (वय २६. राहणार कंचनपुर तालुका खामगांव) हा कंचनपुर येथुन लाखनवाडा येथे नागरणी करण्यासाठी गेला असता परत कंचनपुर कडे जातांना लाखनवाडा जवळील नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर वरील ताबा सुटून ट्रॅक्टर पुलाखाली जाऊन पलटी झाला .ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालका संतोष गवई चा ट्रॅक्टर खाली दबून जागीच मृत्यु झाला . घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.पुढील कारवाही हीवरखेड पोलीस स्टेशन चे वाघमारे साहेब करीत आहेत.घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी खामगांव येथे पाठवण्यात आलेला आहे.  पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशन चे वाघमारे  करीत आहेत.

Post a Comment

1 Comments

  1. अतिशय सुंदर पोर्टल चॅनल आहे आपले

    ReplyDelete