Ticker

6/recent/ticker-posts

नगरपरिषदेची स्वच्छता की अस्वच्छता ..



रवि राठोड

पालघर:- शहरातील कचरा गोळा करण्याचे काम पालघर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडुन नवीन ठेकेदाराला देण्यात आले आहे. परंतु सदर ठेकेदारांकडून पालघर शहरात स्वच्छता अभियान ऐवजी अस्वच्छता पसरवण्याचे अभियान जणू सुरू करण्यात आले आहे. पालघर नगरपरिषद क्षेत्रातील वार्डामध्ये कचरा गोळा करणाऱ्या गाड्याच शहरात अस्वच्छता पसरवताना आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात पालघर नगरपरिषदेचे स्वच्छता अभियान ऐवजी अस्वच्छता पसरविण्याचे अभियान सुरू झाले आहे.

शहरातील टेंभोडे परिसरात दत्त नगर येथून गटार साफ केल्यानंतर गटाराचे घाण घेऊन जाणाऱ्या नगरपरिषदेचे वाहनांमधून दत्त नगर, टेंभोडे व खोजा कॉलोनी येथील रस्त्यावर गटारांची घाण सर्वत्र रस्त्यावर पसरत होती. याबाबत त्या परिसरातील जागरूक नागरिकांकडून त्या वाहनचालकाला कळविण्याचे प्रयत्न केला असता वाहन चालकाने गाडी अतिवेगाणे तेथून पळवून नेली. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र गटारीचे घाण पसरले असून परिसरात दुर्गंध देखील पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी याविषयात नगरपरिषदेले सुचवले असून त्यांनी नगरपरिषदेकडे सम्पूर्ण रस्त्याची साफसफाई करून देण्याची मागणी केली आहे.

हे गटारामधील घाण चिखल नगरपरिषदेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनामधून रस्त्यावर पडले असून आता हे साफ न केल्यामुळे सुकून जातील व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे धूळ स्वरूपात परिसरात पसरून रोगराईला आमंत्रण देईल.

कृष्णा पाटील, नागरिक,टेंभोडे

Post a Comment

0 Comments