Ticker

6/recent/ticker-posts

मोठा अपघात| ट्रक आणि बस मध्ये भीषण अपघात


सहा जण दगावले तर 10 जण गंभीर जखमी

गजानन सरकटे

बुलडाणा:-मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातात ६ जणांचा मृत्यू तर १० गंभीर जखमी झाले. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील पळसखेड चक्का येथे ट्रक व बस चा अपघात झाला असून बस पुण्यावरून मेहकर येथे येत होती. काही मिनिटांचा प्रवास बस थांबण्यासाठी शिल्लक होता परंतु त्या आधीच बसमधील प्रवाशांवर काळाने घाला घातला. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. सिंदखेडराजा नजीक आज दिनांक २३ मे रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. जखमींना पुढील उपचाराकरिता जालना येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी 10 लाख रुपये तत्काळ द्यावेत. तसेच, जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


Post a Comment

0 Comments