Ticker

6/recent/ticker-posts

समर्थ कृषी महाविद्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न



मुन्ना ठाकुर

 दे.राजा:- समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा यांच्या सहकार्याने  करण्यात आले.प्रसंगी कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांनी उपस्थित युवकांना कुठल्याही व्यसना पासून दूर राहून स्वतःचे आरोग्य कसे सांभाळावे याबद्दल युवकांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक ग्रामीण रुग्णालयाचे दंत शल्य चिकित्सक डॉ मानेर यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, मुख कर्करोग तसेच मौखिक आरोग्याची काळजी याबाबत मार्गदर्शन केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना  तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाचे चित्रासह माहिती देऊन होणाऱ्या नुकसानाबाबत अवगत केले. याप्रसंगी दंत शैल्य चिकित्सक डॉ मानेर यांनी उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणार नाही याबद्दल शपथ दिली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार आयुष एलने यांनी व्यक्त केले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रवीण वानखेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ शाहीन आसमा, लॅब टेक्निशियन बाळासाहेब लोखंडे, महाविद्यालयाचे प्रा मोहजितसिंह राजपूत, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा किरण ठाकरे, महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments