सागर शेरे
उमरखेड:-पं स उमरखेड अंतर्गत येत असलेल्या जि.प. उच्च प्राथमिक शाळा चुरमुरा येथे कार्यरत असलेले रामकिशन गुद्दे यांना सन २०२०-२१ चा यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार जिल्हाधिकारी अमोल येडगे , मुख्याधिकारी श्रीकृष्ण पांचाळ , शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक म्हणून शाल, वृक्ष, प्रशस्तीपत्र व पदक देऊन गुणगौरव करण्यात आला.
रामकिशन गुद्दे सर हे चुरमुरा गावातील ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या प्रगतीसाठी नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहान देतात. मिशन-आय ए एस,आय पी एस,आय एफ एस., कम,पीक अॅंड स्पिक, कब-बुलबुल,झेप उपक्रम,बाला उपक्रम,महादीप उपक्रम, नवोदय विद्यालय,स्काॅलरशीप, लीप फाॅर वर्ड (इंग्रजीसाठीचा उपक्रम) यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व हिताच्या दृष्टीने कार्य करतात.तसेच सन २०१५ मध्ये मा. नंदकुमार (प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य ) यांचे शुभहस्ते राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक म्हणून तर सन २०१६ ला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पाठविण्यात आलेल्या शोध निबंधास राज्यस्तरीय शोधनिबंध पुरस्कार (मा.श्री गोविंद नांदेडे , शिक्षण संचालक) प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे श्रेय आई, सहचारिणी,कुटुंबीय, मार्गदर्शन करणारे अधिकारी, मुख्याध्यापक,सर्व सहकारी शिक्षक, मित्रमंडळी आणि विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांमुळे पुरस्कार मिळाला त्या सर्व विद्यार्थी यांना जाते. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
0 Comments