Ticker

6/recent/ticker-posts

अपघातात मुत्यू पावलेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !



सतीश पाटील तेजनकर

सुलतानपुर :-रजे वर आलेल्या  मराठा बटालीयन सैनिकाच्या दुचाकी ला  अज्ञात वाहणा ने दिलेल्या धडकेत  ता. १७ ला जगीच ठार झालेल्या सैनिका वर आज ता. १८ ला  शासकीय इतमामात अत्यंत जड अंतकरणा ने अखेरचा निरोप देण्यात आला .

 सामान्य शेतकरी  कुटुबातील  विकास शालीकराम गायकवाड यांना शालेय देशे पासुन देश सेवेची इच्छा असल्याने त्यांनी दृष्टीने प्रत्यन ही केले देशरक्षणासाठी मी निधडया छातीने कायम समोर अशी अपेक्षा ठेवुन असलेल्या   जवान विकास च मात्र र्दुदैव केवळ ३ ते ४ वर्षाची सेवा बाकी असतांनाच तेही गावी आल्यावर काळाने डाव साधला आणि ३० वर्षीय निधड्या छातीच्या जवाना ला स्वतःच्या गावा जवळच झालेल्या अपघात आपला  जिव  गमवावा लागला या  तिव्र दुःखद घटणेणे येसापुर - भानापुर परिसरातील शेकडो नागरिकांनी पानावलेल्या डोळ्यानी अखेर ची श्रद्धांजली वाहीली .यावेळी बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव , मेहकर मतदार संघाचे आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी श्रद्धांजली अर्पण करित शोक संवेदना व्यक्त केल्या .दरम्यान  राजर्षी शाहुपरिवाराचे अध्यक्ष संदिप शेळके , सैनिक कल्यान अधिकारी पडघान , लोणारचे तहसीलदार गिरिश जोशी , निवासी तहसीलदार डोळे , मंडळ अधिकारी जे . एम . येऊल ,  तलाठी संतोष पनाड ,  विज वितरण चे पंजाबराव बोबडे ,के .ल . फोलाने  पो .कॉ. राजेश जाधव तसेच सरपंच पंजाबराव बोबडे , मारोतराव धांडे , प्राचार्य गजानन धांडे , दत्तात्र्य पडघान , हणुमतराव गायकवाड , राजेश भानापुरे , पत्रकार सागर पनाड  आदिनी श्रद्धांजली अर्पण केली .

" देश रक्षणा साठी घरादाराची परवा न करता देश रक्षणाचा भार सांबाळणारा जवान आपल्या  वडीला चा  उतरत्या वयात वडीला चा आधार असणार्या एकुलत्या एक मुलाच्या अत्यविधी  चा भार उचलता ना पाहुन उपस्थिती नी सुद्धा आपल्या भावना ना वाट मोकळी करून दिली तर वडीला च्या अंगाखांद्यावर खेळण्या बांगाडच्या वयात    मुतक जवान विकास च्या एकुलत्या ऐक ४ वर्षीय मुलाला वडील विकास च्या तिरडी चा भार उचलतांना पाहुन अनेकांना गहीवरुण आले .


" देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुलतानपुर येथील राजर्षी शाहु शाखेत पंतस्थेत विकास गायकवाड च्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते मात्र ते अशा प्रकारे आपल्या तुन निघुन गेलेत या घटनेने मन  गहीवरुन आले "

- संदीपदादा शेळके

अध्यक्ष राजर्षी शाहु सोशल फाउंडेशन



)
मृतक जवनाला श्रद्धांजली अर्पन करतांना खा . प्रतापराव जाधव .


Post a Comment

0 Comments