वाशिम :- रिसोड तालुक्यातील पिंप्री सरहद्द येथे मागच्या अनेक वर्षापासून गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करून गावाला दारू मुक्त करायचे या उद्देशाने नुकतेच निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य राहुल गाभणे व तुषार तायडे सह सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. तर यासाठी गावकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.
मागच्या अनेक वर्षापासून येथे अवैध दारू विक्री चा व्यवसाय पोलीस प्रशासनाच्या डोळ्यादेखत सर्रासपणे सुरू आहे. मध्यंतरी पोलीस प्रशासनाने अनेकदा धाडी टाकून यावर पायबंद घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. हे विशेष. पोलीस विभागाद्वारे धाडी टाकून हि गावातील दारू विक्री बंद होत नसल्याने पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीच अवैध दारू विक्रीला प्रोत्साहन देत आहेत का? असा आरोपही गावकऱ्यांनी करीत आहेत.
नवीन पिढी दारूच्या आहारी जात आहे तसेच मागील काळात दारूमुळे येथील बऱ्याच युवकांनी आपला जीव देखील गमावला आहे. त्यादरम्यान काही दिवसाकरिता गावातील दारू ही हद्दपार झाली होती परंतु काही दिवसांचा काळ उलटतात दारूचा महापूर गावात रोजच येत असल्याचे संताप जनक मत गावकरी व्यक्त करत आहेत. गाव दारू मुक्त व्हावं यासाठी युवा ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेऊन गावातील पुरुष व महिला मंडळांच्या निवेदनावर सह्या घेऊन घेऊन त्या प्रशासनाकडे जमा करून गाव दारूमुक्त करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी दिनांक 18 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी सरहद्द येथे सरपंच व ग्रामसेवक यांना मागणी केली की, गावातील दारू हद्दपार होण्यासाठी तात्काळ याकरिता ग्रामसभा लावावी व गावकऱ्यांच्या दारू विषयी होणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या हद्दपार कशा करता येईल यासाठी योग्य उपाय योजना करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल ग्रामपंचायत प्रशासनाने उचलले पाहिजे असे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी मागणी केली.
परंतु यासाठी ग्रामसेवक मात्र उदासीन दिसून आले हे नक्कीच अनेक प्रश्न उपस्थित करणारे होते.? नवनिर्वांचीत ग्रामपंचायत सदस्यांनी उचललेल्या या विड्याला कितपत यश प्राप्त होते हे येणारी वेळच सांगणार आहे.
0 Comments