Ticker

6/recent/ticker-posts

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालीका सुरुच


समृद्धी महामार्गावर लक्झरी बसला लागली आग

लक्झरी बस जळुन खाक

कोणतीही जीवीत हानी नाही

किसन लाटे

मेहकर : समृद्धी महार्मावर आपघाताची व गाड्या पेटण्याची मालीका थांबण्याचे नावच घेत नाही,सुलतानपुर मेहकर रोडवरील दोन लक्झरी बस जळण्याची पुनरावृत्ती आज पून्हा पाहावयास मिळाली, आज शनिवार दि.२/५ / २६ दुपारी ४ वाजेच्या सुमारास भर उन्हात खुराणा ट्रॅव्हल्स लक्झरी बस क्र. MH 38 F3899 ने पाठीमागून आचानक पेट घेतला पाहता पाहता आग आर्ध्या बस पर्यंत आली. बसमध्ये जवळपास ४० प्रवासी प्रवास करीत होते आग इतकी भयानक होती की अक्षरशः लक्झरी बस जाळुन खाक झाली.

      सविस्तर खुराणा ट्रॅव्हल्स ची लक्झरी बस क्र.MH 38 F 3899 ही पुण्यावरून ४० प्रवाशी घेऊन पुसदकडे सकाळी निघाली दुपारी चार साडेचारच्या सुमारास मेहकर जवळ चॅनल क्र. २९५. ७०० वर शिवणीपीसा व पार्डा फाट्याच्या मधात अचानक बसने पेट घेतला उन्हाची तिव्रता पाहता बस पेटतच गेली पाठीमागुन येणाऱ्यांनी ड्रायव्हरला [ चालकाला ] सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ड्रायवरच्या लक्षात आले नाही पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले. विशेष म्हणजे चालकाला समजताच चालकाने बस रोडच्या कडेला थांबऊन चालक अकाश जमधाडे रा.पुसद हा फरार झाला.बस थांबउण सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी मात्र झाली नाही. एका प्रवाशाला किरकोळ खांद्याला मार लागल्यामुळे त्याला ताबडतोब रुग्नवाही केद्वारे ग्रामीण रुग्नालय मेहकर ला हालवण्यात आले. यासाठी पार्डा व शिवणीपिसा शिवारातील शेतकरी बांधव मदती साठी धाऊन आले. परंतु यामध्ये खुराणा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस मात्र जळुन खाक झाली.

       घटनेची माहीती मिळताच पोलीस उपकेंद्र फर दापुरचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राउत हवालदार क्र ९९ ८ पोलीस कॉन्स्टेबल १५५९,२७३१, २६११ आणि एम एस एफ चे जवान यांचे पथकाला माहीती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचुन सायंकाळी ७ वाजेपर्यंत मदत कार्य करण्यात आले.



Post a Comment

0 Comments