कब्रस्तानच्या वॉल कंपाऊंडचे संजय रायमुलकर यांच्या हस्ते भूमिपूजन
गजानन सरकटे
अंजनी बुद्रुक येथे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या निधीमधून मुस्लिम समाज बांधवांच्या कब्रस्तान कंपाउंड वॉलसाठी वीस लाख रुपये मंजूर करण्यात आले या कार्यक्रमाचे 31 डिसेंबर रोजी माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर म्हणाले की मेहकर मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात आपण सर्वधर्मसमभाव जोपासून सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केले सर्व समाजाचा विकास व्हावा यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले कुठेही भेदभाव केला नाही मेहकर व लोणार तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक स्थळासाठी प्रत्येक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात विकास निधी दिलेला आहे इतर समाजाला सुद्धा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या मार्गाने विकास निधी दिलेला आहे मग आमचे नेमके चुकले कुठे हेच समजले नाही मात्र झाले गेले पार पडले आता यापुढे सर्वांनी कोणत्याही भुलथापाला बळी पडू नका येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेना पक्ष व महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे सर्वांनी उभे राहावे आपला पराभव जरी झाला असला तरी आपण महाराष्ट्रात व केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहोत त्यामुळे भविष्यातही विकास निधी आणताना आपल्याला कुठेही अडचण येणार नाही जी गावकऱ्यांची कामे असतील ती कामे 100% पूर्ण करण्याचे आश्वासन या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी देतो मात्र यापुढे सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने शिवसेनेच्या व महायुतीच्या पाठीमागे रहावे असेही माजी आमदार संजय रायमुलकर साहेब म्हणाले भाषण करत असताना रायमुलकर साहेब चांगलेच भावनिक झाले होते
यावेळी माजी सभापती जुने शिवसैनिक सुरेशराव आढाव हे मार्गदर्शन करत होते यावेळी मार्गदर्शन करत असताना झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायमुलकर साहेबांचा झालेला पराभव हे मेहकर मतदार संघाचे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले तर भाषण करत असताना सुरेशराव आढाव हे भावनिक होऊन त्यांचे अश्रू अनावर झाले एवढा चांगला माणूस 24 तास घरदार सोडून जनतेच्या सेवेमध्ये राहणारा माणूस म्हणजे रायमुलकर साहेब व अशा माणसाचा विधानसभेत कोणतीही चूक नसताना पराभव होतो हे मेहकर मतदार संघाचे दुर्दैवच म्हणावे लागेल यावेळी सुरेशराव आढाव हे मात्र चांगलेच भावनिक होऊन त्यांना अश्रू आवरता आले नाही या कार्यक्रमाला सरपंच, किरण पारिस्कर, माजी सभापती सुरेशराव आढाव, डॉ वसंत नागोलकर, ता उपप्रमुख समाधान साबळे,माजी सभापती बाबूराव नागोलकर, माजी सरपंच अरुण लाड, उध्दव आल्हट, गजानन नागोलकर, राम राऊत, विजय आढाव, रमेश जाधव, विलास आल्हट, विजयजी आल्हट, श्रीराम नागोलकर, संजय जाधव, अरविंद जोशी ,सह शेकडो ग्रामस्थ हजर होते शेख एजाज शेख कासम
अफरोज अली, शेख अलीम
शाहरुख पठाण, कलीम मामू ,
मा ग्राम पंचायत सदस्य रियाज अली, गफूर बेग
फेरोज पठाण ,अहेमद अली,
गजानन तडस, दिलीप आढाव, प्रकाश खोडवे ,नुर शेख सोहील,नजीर अली ठेकेदार, तौफिक पठाण,सै सत्तार,शे सलीम, जुबेर अली,शे,छोटु,ईर्शाद अली,बंबु अली दुकानदार, आसिफ पठाण,कौसर अली,ईसा भाई,शेख हामिद भाई, शेख चांद, दिलदार अली, अमजद पठाण,यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments