Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्याची 41 लक्ष रुपयाची फसवणूक करून दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला ठोकल्या पिंजर पोलिसांनी बेड्या

 

प्रदिप गावंडे 

 बार्शीटाकळी प्रतिनिधी 

तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे हातोला येथील रहिवासी पुरुषोत्तम रामचंद्र काजे यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी हातोला आणि परिसरातील शेतकऱ्याचे 41 लक्ष रुपयाचे सोयाबीन घेऊन पैसे घेऊन तो फरार झाला होता,दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अमरावती जिल्ह्यातील मौजे मौजे मोझरी गुरुकुंज येथून येथून पिंजर पोलिसांनी मोठ्या सीताफिने अटक केली आहे, त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, आज शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे,

 प्राप्त माहितीनुसार,

  पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे हातोला येथील रहिवासी पुरुषोत्तम रामचंद्र काजे याने गेल्या दिनांक 1/ 9/ 2024 रोजी गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल ताब्यात घेऊन त्याची परस्पर विक्री करून स्वतः पैसे हडप केल्याची घटना घडली होती, या गंभीर घटनेचे गांभीर्य पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक नवघरे व त्यांच्या टीमने लक्षात घेतले, जेव्हा केव्हा वेळ मिळेल,तेव्हा या आरोपीच्या शोध घेण्यासाठी पिंजर पोलीस मोठे प्रयत्न करीत होते, या गंभीर प्रकरणातील आरोपीला अमरावती जिल्ह्यातील मोझरी गुरुकुंज येथून ताब्यात घेतले आहे, आज शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे असे सूत्रांनी सांगितले, पुरुषोत्तम रामचंद्र काजे हा मूळ रहिवासी हातोला येथील असून शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन तो ठोक मोठ्या बाजारात विकायचा, अशातच त्याने लोकांवर त्याने विश्वास निर्माण केला होता, त्यामुळे त्याने दिनांक 1 मे 2024 रोजी शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात शेतमाल ताब्यात घेऊन त्याची परस्पर बड्या शहरात विक्री करून विक्री केली आहे, आणि त्याचा पैसा घेऊन तो वरील तारखेपासून फरारच होता, ही घटना घडल्यापासून हातोला येथील संबंधित शेतकऱ्यांनी सन तीवार चांगला करणे, सोडून दिले होते, अशा प्रकारामुळे शेतकऱ्यावर अतिशय वाईट प्रसंग वळवला, यापासून अनेक शेतकरी अतिशय परेशान झालेले होते, आरोपी हा 40,89,415 रुपयाचा शेतमाल परस्पर विकून फरार झाला होता, सदर घटनेपासून पिंजर पोलीस त्याच्या मागावर होते, अशातच पिंजर चे ठाणेदार गंगाधर दराडे आणि सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक नवघरे यांना खबऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाल्यानुसार,,त्यांनी योग्य तो सापळा रचला,आणि पोलीस स्टेशन मधील सर्व जमादार आणि पोलीस कॉन्स्टेबल यांच्या सर्वांच्या सहकार्याने अमरावती जिल्ह्यातील मोझरी गुरुकुंज येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, आज शुक्रवारी आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे, ही सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, मूर्तिजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे, एलसीबी यांच्या सर्वांच्या पिंजर चे ठाणेदार गंगाधर दराडे सहाय्य पोलीस निरीक्षक अभिषेक नवघरे व त्यांच्या सहकार्याने ही धडक कारवाई केली आहे, आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे,



Post a Comment

0 Comments