Ticker

6/recent/ticker-posts

पळसखेड तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माणिकराव खरात यांचे अविरोध निवड



 _रिसोड/प्रतिनिधी_ 

पळसखेड येथे दिनांक 29 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, अध्यक्षस्थानी सरपंच गौतम शिरसाठ हे होते. यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच गावातील जेष्ठ मंडळी यावेळी उपस्थित होते. यामध्ये संभाजी ब्रिगेडचे रिसोड मालेगाव विधानसभा अध्यक्ष अर्जुन पाटील खरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब खरात माजी संचालक अंबादास खरात माजी सभापती सुभाषरावजी खरात माजी तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव पाटील खरात यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दोन अर्ज आले होते त्यामध्ये अर्जुन पाटील खरात व माणिक पाटील खरात या दोघांचे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाकरता अर्ज भरले होते यावेळी अर्जुन पाटील खरात यांनी गावात कोणताही वाद होऊ नये म्हणून स्वतः अर्ज मागे घेत माणिक पाटील खरात यांची अविरोध निवड केली यावेळी गावातील सर्व समाजातील लोकांना तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष पदी भारत बाजीराव खरात प्रकाश दगडू गरजे देवानंद प्रभाकर मोरे प्रभाकर सिताराम गुंजकर अनिल महादेव खरात सुदामा विठोबा फड यांची सर्वानुमते उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी गावातील खुशालरावजी खरात गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष दिलीपराव खरात पुंजाजी पाटील अंबादासजी खरात अंबर खरात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात उपाध्यक्ष देवराव खरात विठ्ठल खरात गणेश राव खरात सितारामजी गिरे कैलास कराड अश्रुजी खांजोडे बालाजी खांजोडे ज्ञानेश्वरजी गव्हाणे गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते यावेळी अर्जुन पाटील खरात यांनी गावात कोणतीही भांडण होणार नाही व आपल्या गावातील तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे रिसोड मालेगाव विधानसभा अध्यक्ष अर्जुन पाटील खरात यांनी करून तंटामुक्त अध्यक्ष माणिक पाटील खरात तसेच उपाध्यक्ष यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी ग्रामसेवक श्री पडोळे साहेब यांनी ग्रामसभेचे वाचन केले याप्रसंगी घरकुल रोजगार हमी आदी विषयावर गावकऱ्यांची चर्चा केली यावेळी खेळीवेळीच्या वातावरणात तंटामुक्त समिती ची अविरोध निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments