Ticker

6/recent/ticker-posts

अतिक्रमणधारकां वरील दडपशाही खपवून घेणार नाही. - माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे



गजानन सरकटे 

मेहकर , :- मेहकर शहरात गेल्या आठवड्यापासून शासन-प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन अतिक्रमणधारकांच्या काळजावरच घाव घालून त्यांचा पोटासाठी उभारलेला संसार जमीनदोस्त केला आहे. त्यांनी भविष्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांची राख-रांगोली केली आहे. आता प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे अतिक्रमणधारक उघड्यावर पडलेली आहेत. अशा कठीण परिस्थितीत अतिक्रमणधारकांना आधार देण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करीत नगरपरिषदेच्या मुख्यधिकांना घेराव घालत कडक शब्दात जाब विचारला आहे. यावेळी व्यासपीठावर उबाठाचे आमदार सिद्धार्थ खरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, काँग्रेस पक्षाचे पक्ष नेते एडवोकेट अनंतराव वानखेडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष पंकज हजारी, महिला सेवा दलाच्या जिल्हाध्यक्ष सौ आरती दिक्षित व इतर मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना विलास चनखोरे म्हणाले की तुम्ही सुद्धा एक माणूस आहात, एवढे कठोर होऊ नका, आज तुम्ही अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून न देताच त्यांच्या पोटावर लाथ मारुन त्यांचा व्यवसाय जमीनदोस्त केला आहे. आज अतिक्रमणधारक सैरभैर झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, व्यवसाय करण्यासाठी अनेकांच्या डोक्यावर बॅकेचा बोजा आहे. अशा कठीण परिस्थितीत अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या अगोदरच त्यांना उद्ध्वस्त केले. अतिक्रमणधारकांचा मोडलेला व्यवसाय पुन्हा उभा करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्यांना कायमस्वरूपी शासकीय जागा त्यांच्या नावाने करुन देण्यात यावी अन्यथा अतिक्रमणधारकांच्या न्याय-हक्कासाठी तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा मौखिक इशाराच माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांनी शासन-प्रशासनाला दिला आहे. तर आमदार सिद्धार्थ खरात, श्याम उमाळकर, एडवोकेट अनंत वानखेडे, उबाठाचे आशिष रहाटे, वसंतराव देशमुख, दिलीप बोरे, व इतर मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. व अतिक्रमणधारकांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत विविध मागण्यांचे निवेदन नगरपरिषदेच्या मुख्यधिकांना दिले आहे. त्यात नमूद करण्यात आले की, मेहकर शहरातील अतिक्रमणधारकांना पक्के बांधकाम व नझुलच्या जागेवरच्या हद्दीत कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच शहरातील चिल्लर विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा द्यावी आणि जुन्या तहसील कार्यालयाची जागा त्वरित नगरपरिषदेला हस्तांतरित करुन तिथे व्यापाऱ्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यात यावे व शहरातील पाणी पुरवठा व स्वच्छता दररोज करावी आणि शहरातील मुख्य रोडवरील व्यापाऱ्यांसाठी नजूलशीट प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे आमच्या मागण्या मान्य न केल्यास अन्यथा अतिक्रमणधारकांच्या न्याय-हक्कासाठी तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे यांनी दिला आहे. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्यधिकांना निवेदन देतानी, कॉग्रेसपक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, कॉग्रेसपक्षाचे मेहकर विधानसभा पक्षनेते एडवोकेट अनंतराव वानखेडे, शहराध्यक्ष पंकज हजारी, सेवादलाचे महिला अध्यक्ष आरती दीक्षित, माजी नगराध्यक्ष राजेश अंभोरे, माजी तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी न.प. उपाध्यक्ष अनिल शर्मा, माजी नगरसेवक शैलेश बावस्कर, माजी नगरसेवक रवी सावजी, माजी नगरसेवक संजय मस्के, माजी नगरसेवक उस्मानशहा, माजी नगरसेवक नितीन तुपे, युवानेते वैभव उमाळकर, कॉग्रेसपक्षाचे पदाधिकारी नारायण पचेरवाल, मुनाफ खान, शाहूभाई गवळी, युनुस पटेल, रियाज कुरेशी,  अस्लम गवळी,  सुखदेव ढाकरके, सुनील अंभोरे, आकाश अवसरमोल, धर्मा बनचरे, आशुतोष तेलंग, विकास पवार, विनायक टाले, प्रदिप देशमुख, संजय सुळकर, डॉक्टर बदर, अशोक इंगळे, दिलीप बोरे, विजय चव्हाण, भैय्यासाहेब पाटील आदिच्या निवेदनावर सह्या आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश बावस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन युनुस पटेल यांनी केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, व शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments