Ticker

6/recent/ticker-posts

देवदर्शनावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला बापलेक दोघ ठार तर चार गंभीर जखमी



आवेज खान 

डोणगाव -पोलीस स्टेशन अंतर्गत समृद्धी महामार्गच्या चॅनल नंबर 268 वर इर्टिगा गाडीचा अपघात झाल्याची घटना 11 एप्रिल रोजी सकाळी साडेतीन वाजता घडली यात दोन जणांचा जागीच मृत्यू तर चालक व चार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

वाशिम येथील रतन चंदनशिव पत्नी आशा रतन चंदनशिव मुलगी पूजा रतन चंदनशिव, मुलगा गोपाल रतन चंदनशिव, सून राणी गोपाल चंदनशिव, नातू योगेश गोपाल चंदनशिव चालक शिवाजी विढोळे राहणार सर्व वाशिम हे आपल्या ईरटीगा क्रमांक एम एच 11 सी क्यू ८५६६ गाडीने शिर्डी , तुळजापूर येथून देवदर्शन करून वाशिम येथे जात असताना डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चॅनल नंबर २६७ जवळ समोर जात असलेल्या ट्रक क्रमांक आर जे २९ जीबी २७२० ला मागून धडकल्याने गाडीत बसलेले रतन चंदनशिव वय 56 वर्ष व मुलगा गोपाल रतन चंदनशिव वय 38 वर्ष दोघांचा जागी मृत्यू झाला मुलगी पूजा रतन चंदनशिव यांच्या डोक्याला तर आशा रतन चंदनशिव यांचे दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली तर उर्वरित सर्वच गंभीर जखमी झाल्याची घटना 11 मार्च रोजी सकाळी साडेतीन वाजता घडली. गस्तीवर असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशनचे हर्ष सहगल व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिकेला संपर्क साधून अपघात झाल्याची माहिती दिली व अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेत टाकून मेहकर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी रतन चंदनशिव गोपाल चंदनशिव यांना मृत घोषित करून उर्वरित गंभीर जखमींना संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

Post a Comment

0 Comments