गजानन सरकटे
विशेष बातमी
मेहकर:-सामाजिक चळवळीत राहून मेहकर, लोणार मतदार मतदार संघावर आपली सामाजिक कर्तुत्वाची छाप ठेवुन शेवटच्या घटकातील माणसाला न्याय मिळवून देणारे मा.मंत्री सुबोध सावजी यांच्या ८० वा जन्म दिवस अभिष्टचिंतन सोहळा सप्ताह व त्यांच्या अर्धांगिनी स्व.सपनाताई सुबोध सावजी यांच्या २५ व्या पुण्यस्मरण निमित्ताने डोणगाव नगरीत विविध सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये ३ जानेवारी रोजी सकाळी ११:३०ते दुपारी०३ पर्यंत सपनाताई सावजी नगर डोणगाव येथे जन्म दिवस व पुण्यस्मरण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मशुर कव्वाल मुस्तफा अजीज नाज [ मुंबई] यांच्या कव्वालीचा कार्यक्रम सायंकाळी ०६ वाजता होणार आहे तर ६ जानेवारी ला दुपारी ४ वाजता तुम्ही खाता त्या भाकरी वर बाबासाहेब ची सही आहे रे अशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या भिम गिताचा कार्यक्रम होणार आहे. तर ७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल तर ८ जानेवारी रोजी दुपारी ०४ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे . यावेळी जन्मदिवसाच्या अभिष्टचिंतनात फक्त शाल पुष्पगुच्छ आणि हार स्वीकारल्या जाईल नगदी पैसे आणि भेट वस्तू स्वीकारल्या जाणार नाही आणि मेहकर लोणार मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला वेळेवर हजर राहावे असे आव्हान कार्यक्रमा आयोजक माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी केले आहे
0 Comments