Ticker

6/recent/ticker-posts

संजनाताई गवळी यांची शाह कुटुंबाची सांत्वनपर भेट.



रिसोड:-31 डिसेंबर रोजी माजी खासदार व विद्यमान विधान परिषद आमदार भावना ताई गवळी यांच्या भगिनी संजना ताई गवळी यांनी पिंपरी सरहद्द येथे शाह कुटुंबाची सांत्वनपर भेट दिली. 21 डिसेंबर रोजी 29 वर्षीय सद्दाम इब्राहिम शाह याचा विद्युत खांबावरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता.सद्दाम हा मेहनती युवक असून, कुटुंबाचा प्रमुख आधार होता. त्याच्या निधनाने शाह कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. घरातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही सद्दामने आपल्या मेहनतीने वेगळी ओळख निर्माण केली होती.संजना ताई गवळी यांनी शाह कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.या भेटीदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश पाटील शिंदे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप पाटील मोरे, जीवन वानखेडे, दिलीप गवळी, सुनील गवळी, सचिन काळे आणि इतर स्थानिक मान्यवर उपस्थित होते. संजना ताई यांनी शाह कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना सांत्वन दिले.

Post a Comment

0 Comments