Ticker

6/recent/ticker-posts

उद्या केनवड येथे अजितपर्व विजय संकल्प मेळावा


 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पुढाकार

आमदार निलेश लंके करणार मार्गदर्शन


वाशिम:-

पारनेरचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते निलेश लंके यांच्या उपस्थितीत रिसोड तालुक्यातील केनवड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा अजितपर्व विजय संकल्प मेळावा २०२४ आयोजित केला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा हा संकल्प मेळावा बुधवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळीं ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक आठवडी बाजार केनवड विजय संकल्प मेळावा जिल्हा अध्यक्ष हाजी मो.युसुफ सेठ पुंजानी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.


रिसोड मालेगांव तालुक्यातील युवकांना मोलांचे मार्गदर्शन आमदार निलेश लंके करणार आहेत. तसेच शेतकऱ्याच्या समस्या, युवक रोजगार अशा अनेक संवाद साधणार आहेत. यासाठी प्रा प्रशांत पाटिल गोळे मिञ मंडळ यांना नियोजनाची जबाबदारी सोपवली आहे. 

तरी या मेळाव्यासाठी ज्येष्ठ नेते दत्तरावजी डहाके, अशोकराव परळीकर जयकिशन राठोड भगवानदादा शिरसागर,कांतीलाल भोसले सरपंच मावळेवडी, अनिल गंधाक्ते निलेश लंके प्रतिष्ठान अध्यक्ष पारनेर,

विध्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश पाटिल शिंदे, महीला आघाडी सिमाताई सुरुशे, ओबीसी सेल चे मोहन भताणे, मालेगांव तालुकाध्यक्ष सुशांत जाधव, रिसोड तालुकाध्यक्ष अशोकराव जाधव, रिसोड शहर अध्यक्ष अरुण शिरसागर, वाशिम तालुकाध्यक्ष सुनिल आखंड, मानोरा तालुकाध्यक्ष राजेश नेमाने, मंगरूळपीर तालुकाध्यक्ष संतोष ठाकरे, कारंजा तालुकाध्यक्ष अमोल ठाकरे वाशिम शहर अध्यक्ष गोविंद वर्मा,सह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.बूथ सशक्तीकरणाचा महत्वपूर्ण संघटनात्मक कार्यक्रम, विजयाचा संकल्प, राजकीय परिस्थिती अशा अनेक विषयांवर आमदार निलेश लंके मार्गदर्शन करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध आघाड्या, मोर्चे यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पाटील गोळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments