फिरोजशाह
विशेष बातमी
वाशिम:-मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक ग्रामपंचायतीचे युवा मा.उपसरपंच गजानन सुखदेव सरकटे यांना मातोश्री वच्छलाबाई कळणूजी गवई शैक्षणिक संस्था साखरखेर्डा व दैनिक महाराष्ट्र सारथी व दैनिक चौफेर दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा संत गाडगे महाराज“समाजरत्न” पुरस्कार जाहीर झाला आहे.
गजानन सरकटे हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून मागील पंचवार्षिक मध्ये उपसरपंचपदाबरोबच समाजिक कार्यामध्ये मानाचे स्थान निर्माण केल आहे. आपल्या कार्यकालामधे अनेक लोकांना शैक्षणिक, सामाजिक व अर्थिक मदत सातत्याने करीत आहेत. गावच्या सर्वांगिण विकास कामासाठी अहोरात्र झटत असतात. विविध कल्याणकारी योजना राबऊन गाव परिसराचा विकास करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. सर्व धर्माच्या सण, उत्सवात सहभाग घेऊन सामाजिक सलोखा राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. तसेच पत्रकार या पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा १३ वर्षाचा दांडगा अनुभव या माध्यमातून त्यांनी अनेक शोषित, पीडित, वंचित ,दुर्लभ घटकांसाठी आपले लेखणीचे शस्त्र उचलले आहे.त्यांच्या या समाजिक कार्याची दखल घेवून संत गाडगे महाराज “समाजरत्न”पुरस्कारासाठी निवड केली आहे. शनिवारी ( दि. ३० डिसेंबर) साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कूल शेंदुर्जन रोड येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. गजानन सरकटे यांना पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 Comments