फिरोजशाह
विशेष बातमी
दरवर्षी मृग नक्षत्रांमध्ये पेरणी करण्यात येते. परंतु या वर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. पावसाअभावी बळीराजा चिंतेत सापडला आहे. म्हणून वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक ४ जुलै रोजी मेहकर येथे अंकोश राठोड यांनी श्री संत गजानन महाराज चरणी नतमस्तक होऊन साकडे घातले दुष्काळातून मुक्ती मिळावी, पाऊस पडून पेरण्या व्हाव्यात तसेच शेतकऱ्यांचा अति महत्त्वाचे असणारे सोयाबीन पीक चांगल्या प्रकारे येवो. लवकर पाऊस पडू दे...पेरणी होऊ दे व बळीराजाचे राज्य येऊ दे, असे साकडे या वेळी अंकोश भाऊ राठोड व दैनिक सेवाशक्ती टाइम्सच्या संपादक मंडळाच्या वतीने घालण्यात आले.
राज्यात पावसाच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण केली होती. तसेच हळदी आणि सोयाबिन पिकांसाठी शेतकऱ्यांनी मशागतीची तयारी पूर्ण केली होती. पंरतु मान्सूनने अजूनही योग्य प्रमाणात हजेरी न लावल्यामुळे आता पेरणी कशी करायची असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.एक ते दिड महिन्यांपासून शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी आता मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. मशागत करुन लवकर पाऊस न पडल्यामुळे दुबार मशागत करावी लागणार असल्याची चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा देखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागून राहिलेली मान्सूनची प्रतिक्षा कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0 Comments