Ticker

6/recent/ticker-posts

कर्नाटक राज्यात जे झालं ते महाराष्ट्रात घडू नये - राजपालसिंह राठोड


मनोज चव्हाण 

वाशिम महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बंजारा समाजाच्या संवैधानिक हक्क आणि अधिकारावर गदा आणत संभाजी नगर येथे विजा (अ) मधील 'भामटा' शब्द वगळण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे विमुक्त जाती (अ) मधील सर्वात मोठा समाज असलेल्या बंजारा समाजासह इतर १४ जातीवर फार मोठा अन्याय होणार आहे. यामुळे 'मूळ राजपूत भामटा' सोडता इतर सर्व उच्चवर्णीय राजपूत समाजाचा (सुमारे एक ते दिड कोटी) असंवैधानिक, अवैधरीत्या प्रवेश होणार आहे. भविष्यात या आरक्षणाचे मूळ हकदार असलेला बंजारा समाज व तत्सम १४ जाती यांना शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळणे कठीण होणार आहे. याविरोधात बंजारा समाज आणि मुळ राजपूत भामटा समाज आक्रमक झाला असुन मंञालयात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंजारा समाज आणि मुळ राजपूत भामटा समाज यांच्या शिष्टमंडळाची मिंटीग झाली.

      यावेळी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजपाल सिंह राठोड यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. 'भामटा' शब्द वगळण्याची आपण घोषणा केल्याने महाराष्ट्रातील दोन कोटी बंजारा समाजामध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अख्खा बंजारा समाज यामुळे अस्वस्थ आहे. यावेळी मा. मुख्यमंत्री यांना बोलताना म्हणाले की काही दिवसांपूर्वी आपण विजा (अ) मधून 'भामटा' शब्द वगळण्यात येईल असे आश्वासन राजपूत समाजाला दिले. यामुळे बंजारा समाज व विजा (अ) मधील १४ तत्सम जाती यावर अन्याय होणार आहे. जे कर्नाटक मध्ये बंजारा समाजासोबत झाले त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये. अन्यथा अख्खा महाराष्ट्रातुन बंजारा समाज आपल्या पांढर्या वादळासह मंञालयावर येईल. आम्ही बंजारा समाज हे कदापी सहन करणार नाही. बंजारा समाजाच्या मूळ २८ मागण्यांना बगल देऊन केवळ पाचशे करोड रुपयावर बंजारा समाजाची बोळवण करणे याने बंजारा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. बंजारा समाजाचे मूळ प्रश्न जसे पदोन्नतीतले आरक्षण मिळणे, नॉन क्रिमीलेअर रद्द करणे, तांड्याला स्वतंत्र महसुली दर्जा देणे, वसंतराव नाईक महामंडळाची भरीव तरतूद करणे यासह विविध समस्या बंजारा समाजाच्या आहेत आपण त्या सर्व मागण्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावर मा मुख्यमंत्री विजा (अ) मधून भामटा न वगळता बंजारा समाजाच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले. 

   यावेळी मंञी संजय राठोड कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आमदार राजेश राठोड, निलम नाईक, तुषार राठोड,माजी खासदार हरिभाऊ राठोड,डॉ अनिल साळुंखे,डॉ.टी सी राठोड,श्री अभय चव्हाण,डॉ. कृष्णा राठोड,अरुण राठोड गोरसेना, देविदास राठोड,मिलिंद पवार,डॉ.गणेश राठोड,डॉ. राम चव्हाणयांच्यासह बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, नेते व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments