Ticker

6/recent/ticker-posts

अबब..... ग्रामपंचायत ने सहा महिन्यात एक हि ग्राम सभा घेतलीच नाही


अनिल दराडे 

सिंदखेड राजा:-आडगाव राजा येथी ग्रामपंचायत निवडणूक उलटूनही अखेर पाच ते सहा महिने होत आहे तरी हि आता पर्यंत ग्रामपंचायत कार्यालया मध्ये एक सुद्धा ग्राम सभा झालेली नाही. गावामध्ये गावाचा विकास करायचा म्हटलं तर जनतेच्या समस्या आडि अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामसभा घ्यायला पाहिजे परंतु ग्रामसेवक साहेब नेहमीच उडवा उडवीचेच उत्तर देतात, माझ्याकडे अनेक गावे आहेत, हेच कामे करायचे का माझ्याकडे चार्जे आहे मी घेऊ शकत नाही, त्यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्या मांडायच्या आहेत परंतु हि व्यथा मांडायची कुणाकडे हा प्रश्न पडला आहे.आता गावामध्ये पिण्याचे पाणी खराब झाल्याने लोक बिमार सुद्धा पडत आहे, तरी ग्रामसेवक साहेब यांनी कधी लक्ष दिले नाही किंवा ब्लिचिंग पावडर टाकण्यास सांगितले नाही. कधी हि आडगाव राजा येथे दोन ते तीन महिन्या शिवाय गावात फिरकले नाही. काही लोकांना नाल्यांचा खूप त्रास असतानि सांगितले पण ते काही मनावरचं घेत नाही. यांच्या अशा वागण्याने जनता संतप्त झाली आहे. असा मनमानी कारभार ग्रामसेवक साहेबांचा सुरु आहे. तसेच म.न.वि से जिल्हा उपाध्यक्ष अतिष राजे यांनी ग्रामसेवक बोरुळ साहेब याना ग्रामसभा लावण्या बाबत निवेदन सुद्धा दिले आहे तरीही त्यांनी कुठलीच ऍक्शन घेतली नाही यावरून असे वाटते गावात राजकारण तर झाले परंतु ग्रामसेवक साहेब यांचे वेगळॆच काहीतरी राजकारण सुरु आहे. तरी हि आणखी परत जर सात दिवसात ग्रामसभा घेतली नाही तर लोकशाहि  मार्गाने ग्रामपंचात कार्यालय आडगाव राजा शिवाजी महाराज चौका समोर आंदोलन करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments