....
जगात जी माणसं महान ठरलीत त्यांनी संघर्ष केला आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण केले.
"जो पाणीसे नहाते है, वॊ लिबास बदलते है, और जो पसीनेसे नहाते है वॊ, इतिहास बदलते है!! अश्या संघर्षशिल माणसाबद्दल काय बोलावं.....
थांबतो तो संपतो,या न्यायाने सतत कार्यप्रवण राहून ज्यांनी शून्यातून शंभर बनविले, आपले सुंदर विश्व साकारले . स्वतःच एक जग आकाराला आणलं. जीवाला जीव लावणाऱ्या मित्रांचा गोतावळा गोळा केला.गोत्यात आणणारी नाती त्यापेक्षा नात्यात गोडी आणणारी माणसं आपल्या प्रेमळ स्वभावाने जोडली असा धडपडया कार्यकर्ता,वृत्तपत्र विक्रेता, पत्रकार, संपादक ते एक सेवारत समाजसेवक अशा विविध भूमिका ज्यांनी हसत खेळत साकारल्या...... ज्यांच्याबद्दल
इतकंच की, आंधीयोके बीच जो जलता हुआ नजर आयेगा, उस दियेसे पुछ लेना तुम्हे गजूभाऊका पता मिल जायेगा ll....
स्व अस्तित्वाच्या वाटेवर चालत असतांना मानवी कार्य आणि स्वभाव माणसाला ओळख देत असतो. आपल्या प्रेमळ आणि सुस्वभावी वर्तनाने सर्वांच्या हृदयात स्थान मिळवणारे एक निर्भीड झुंजार पत्रकार, एक अभ्यासू ध्येयवेडा संपादक, एक निर्मळ मनाचा निस्वार्थी, निगर्वी माणूस, फुले शाहू, आंबेडकरी विचाराचा खरा वारसदार...... आमचे लाडके मित्र गजाननभाऊ सरकटे.. दैनिक सेवाशक्ती टाइम्सचे कार्यकारी संपादक... यांचा आज वाढदिवस......
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा धांडोळा घेत असताना, त्यांच्या जीवनाचे विविध पैलू अंतरंग खोलून आपल्यासमोर उभे राहतात.
प्रत्येकाची आयुष्य जगण्याची आणि आयुष्यातला आनंद व समाधान शोधण्याची रीत वेगळी असते. काही माणसं स्वतःसाठी जगता जगता स्वतःचं जगणंच विसरून जातात आणि इतरांचे होऊन जातात." अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आवरीता परी येत नाही " या न्यायाने तुमच्यातील मूळ स्वभाव म्हणजेच स्थायीभाव कधीही बदलत नाही. " देखकर दर्द जमाने का, वॊ मायुस हो गया, अपने आपको जलाकर वॊ किसीके काम आ गया "जगणं समृद्ध करणाऱ्या
अश्या या सदाबहार, दिलखुलास
मित्राचा जन्म मेहकर तालुक्यातील शेलगाव काकडे या गावी झाला.20/12/1983या दिवशी एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मात्र घरची बेताची, जेमतेम परिस्थिती यामुळे त्यांना अंजनी बु. येथे राहण्यास जावे लागले. याच गावातील प्राथमिक शाळेत त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.अपेक्षा आणि पात्रता यांच्यातील अंतर म्हणजे दुःख. पण विपरीतेच्या छाताडावर उभं राहून त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.अश्या परिस्थितीत वयाच्या 15वर्षांपासून त्यांनी समाजसेवेला सुरुवात केली. दीनदुबळे,दलित, दुःखी, निरश्रीत, पीडित पाहिले की त्यांचं हृदय पिळवटून जात असे. जात, धर्म, पंथ, पक्ष यापेक्षा भारतीय असण्याचा त्यांना प्रचंड अभिमान .बहिणाबाई चौधरी म्हणतात " जिच्या मध्ये नही पाणी त्याले हाय म्हणू नही, धावा ऐकून अडला त्याले पाय म्हणू नही " म्हणूनच गजानन भाऊ बद्दल इतकंच की,तेच म्हणावे दिवे जे वादळातही टिकतात, स्वतः जळत राहून इतरांना उजेड देत राहणं शिकतात "
2010हे वर्ष उजाडलं. त्यांनी एक साधा वृत्तपत्र विक्रेता म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. बुलढाणा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटने सोबत त्यांनी काम केले. त्यातूनच त्यांचे संघटन कौशल्य वाढीस लागले. " वाढता वाढता वाढत जाईल, बिजाचे मग झाड होईल, तुम्ही नसालही कदाचित ते झाड सर्वांना सावली देईल. "
त्यांचे संघटन कौशल्य पाहून त्यांच्यावर मेहकर तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. ती त्यांनी समर्थपणे पार पाडली.यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व आकारास आले. यासोबतच त्यांनी आपल्या कार्याचा ठसा सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा उमटवीला.2016साली अंजनी बुद्रुक येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ते सदस्य म्हणून निवडूनही आले. व पाच वर्ष उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. एखाद्या बिजाचे रूपांतर वटवृक्षांमध्ये व्हावे तसे त्यांची व्यक्तिमत्व बहरत गेले. ग्रामपंचायत मध्ये एकदा निवडून आलेला व्यक्ती लोक दुसऱ्यांदा निवडून देत नाही असा इतिहास आहे. मात्र अंजनी बुद्रुक येथील नागरिकांनी गजानन भाऊ यांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून दिले. एक कर्तबगार, धडपड्या कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये ते निर्णायक सहभाग नोंदवतात. आपल्या गावाचा विकास करण्यासाठी ते कायम कटिबद्ध असतात.संतांचे वचन सार्थ ठरवत " भरा नही भावॊसे,बहती जिसमे रसदार नही, इन्सान नही वॊ पत्थर है, जिसके दिलमे गाव के लिए प्यार नही ll
वृत्तपत्र विक्रेता, पत्रकार, निवासी संपादक या मन लावून केलेल्या कार्याची दखल घेत, दैनिक सेवाशक्ती टाइम्सचे दबंग मुख्य संपादक अंकोशजी राठोड यांनी या वृत्तपत्राची धुरा गजानन भाऊ यांच्या समर्थ खांद्यावर सोपवली. अभ्यासू वृत्तसंपादक फिरोजशहा,मेहनती निवासी संपादक श्री किसन लाटे यांना सोबत घेऊन अल्पावधीत या वृत्तपत्राला त्यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. राज्यभर प्रतिनिधींचे जाळे विणले. दैनिक सेवाशक्ती टाईमचा पहिला दिमागदार आणि दैदिप्यमान सोहळा हॉटेल परिवार, मेहकर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.सर्वात मोलाची भूमिका त्यांनी बजावली. सोपवलेले काम यशस्वीपणे पार पाडणे हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव सर्वांना आवर्जून जाणवला.
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करताना दैनिक सेवाशक्ती टाइम्सचे मुख्य संपादक, एक निर्भीड व्यक्तिमत्व अंकोशजी राठोड यांच्यासह सर्व सेवाशक्ती परिवाराच्या वतीने मनभरून शुभेच्छा देतांना.
आपल्या मनातील अगणित इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत.पुन्हा एक नवी ऊर्जा घेऊन परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपणास मिळो. परिस्थिती बदलता आली नाही तर स्वतःमध्ये बदल करण्याचे सामर्थ आपल्यात येवो.
"पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया तू है वैसा "असं आपलं व्यक्तित्व अधिकाधिक बहारत जाओ.
" ते ते तुम्हास लाभो जे जे मनात तुमच्या, तुळशी हजार नांदो वृंदावनात तुमच्या " आपल्या कार्यकर्तृत्वाने आपले जीवन आनंदाने, समाधानाने बहरून जावो.आपल्या मनातील सुप्त सेवाभावी सदिच्छा फळास येवो. आपल्या जगण्यातील समाधान ओसंडून जावो.सेवाशक्ती परिवाराच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा.🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🙏🏻
आपलाच.
![]() |
कृष्णा हावरे. संपादक दै. से. श. टाइम्स |
0 Comments