प्रकाश चौधरी
भुसावळ येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र भुसावळ द्वारा पाच दिवसीय विनामूल्य समर कॅम्प व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनेतील निसर्ग चित्र हा विषय देऊन चित्र काढण्यास प्रोत्साहित केले विद्यार्थ्यांनीही अतिशय सुंदर रित्या चित्र रेखाटले .दि.23 मे पासून सुरू असलेल्या कॅम्पमध्ये त्यांना मेडिटेशन योगासने ओरेबिक संगीत स्वःची ओळख तसेच संस्कारक्षम गोष्टी यातून संस्कार गीत सांस्कृतिक कार्यक्रम प्रशिक्षणात करण्यात आले .सेवा केंद्राच्या संचालिका बी के सिंधू दीदी यांनी समर्थ विकास प्रशिक्षणाच्या आयोजनाविषयी हल्ली मुले भौतिक गोष्टींच्या आहारी तसेच मोबाईल टीव्ही च्या आहारी जात आहे . शारीरिक खेळ आरोग्य विषयक दुर्लक्ष इतरांमध्ये न मिसळण्याची वृत्ती खानपान व्यवस्था हे दुर्लक्षित होत असल्याने मुलांना जर लहानपणीच योग्य प्रशिक्षण संस्कार दिले गेले तर आयुष्यात पुढे ती सवय कायम राहते यासाठी समर्थ विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात साठी बी के मोहिनी बि के कांचन बी के कविता या बहिणींनी प्रशिक्षणार्थी मुला मुलींना प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये उमंग उत्साह निर्माण केला .
कार्यक्रमाच्या समारोप वेळी व्यासपीठावर सेवा केंद्राच्या संचालिका बी के सिंधुदुर्ग ज्योती दीदी अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील बी के कंचन बहन बी के कविता बहन बी के मोहीनी बहन उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली असे व्यक्तिमत्व विकास शिबिर सेवा केंद्रावर दरवर्षी जास्त दिवसाचा घ्यावा आम्हाला या प्रशिक्षणामध्ये मेडिटेशन व खेळ आणि इतर गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटल्या ते शिकायला आम्हाला या ठिकाणी मिळाले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या पालकांनीही शिबिराविषयी मनोगत व्यक्त केले .
समारोप प्रसंगी नाना पाटील यांनी विद्यार्थ्यांना ससा कासव गोष्टीतून सहकार्याची भावना त्याबरोबर ओंकार भ्रामरी प्राणायाम घेऊन त्यांचे महत्त्व सांगितले व निसर्ग पर्यावरण झाडे लावण्या बाबत आवाहन केले त्यावर त्यांच्याशी हितगुज ही केली . सेवा केंद्राच्या बी.के सिंधु दिदी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वांना प्रमाणपत्र व बक्षिसे वाटप करण्यात आली .
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी पालक यांना ब्रह्मा भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
0 Comments