Ticker

6/recent/ticker-posts

गट ग्रामपंचायत अकोला ठाकरे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन



गजानन सरकटे

मेहकर तालुक्यातील गट ग्रामपंचायत अकोला ठाकरे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त गट ग्रामपंचायत अकोला ठाकरे व खामखेडा येथे अभिवादन करण्यात आले सर्व प्रथम गावच्या प्रथम नागरिक सरपंच अर्चना   ठाकरे ताई यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व उपस्थितांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी उपसरपंच,व ग्रामपंचायत सदस्य,व ग्रामसेवक जी पी मवाळ,हे  उपस्थित होते या वेळी ग्रामसेवक मवाळ यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतलेला आहे. हा पुरस्कार  गावातील होतकरू उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व सामाजिक सांस्कृतिक कार्य करणाऱ्या महिलांना देण्यात आला या मध्ये गट ग्रामपंचायत अकोला ठाकरे 


अन्नपुर्णा कुंडलीक ठाकरे रा.अकोला ठाकरे व  बेबी अशोक नरवाडे रा.खामखेड या महिलांचा सरपंच सौ अर्चना ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी उपसरपंच मनोहर जवंजाळ , ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ठाकरे,तुळशिदास ठाकरे, रेखा पवन ठाकरे, अल्काताई ठाकरे,उशा ठाकरे,आशा सेविका शिंदुबाई ठाकरे ,बंडु ठाकरे, ग्रामसेवक मवाळ,दादाराव चव्हाण,कडुबा चव्हाण, पत्रकार गजानन सरकटे, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होतेया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक जी पी मवाळ यांनी मानले..



Post a Comment

0 Comments