Ticker

6/recent/ticker-posts

शेगांव: अवैद्य रेती साठे व किनी जप्त; महसूल विभागाची कार्यवाही


देवचंद्र समदूर

विशेष बातमी

शेगांव:- पूर्णा नदी पात्रात धाड टाकून अवैद्य रेती उत्खनन करणारे साहित्य तहसीलदार समाधान सोनवणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दि.१६ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास जप्त करण्याची कार्यवाही केली आहे.

 जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार व अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी मोहीम स्वरूपात कडक कारवाई केली जात आहे सदर मोहिमे अंतर्गत शेगाव तालुक्यातील अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस आळा घलण्यास व चोरट्या मार्गाने उत्खनन व वाहतूक होत असल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करणे याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे याच अनुषंगाने दि.१६ मे रोजी शेगाव तालुक्यातील मौजे खातखेळ व सगोडा येथील प्रत्येकी एक व कठोरा येथील दोन पाण्यातून रेती उत्खनन करण्यासाठी वापरात येणाऱ्या चार किनी व त्यांना लागणारे दोन व इतर साहित्य जप्त करून तहसील कार्यालय शेगाव येथे जमा करण्यात आलेले आहे सदर साहित्याची अंदाजे किंमत रुपये तीन लाख आहे तसेच मौजे पहुरपूर्ण खातखेड भोगाव सगोडा व कठोरा येथील एकूण अंदाजे तीनशे दहा ब्रास अवैध रेती साठा जप्त करून तो संबंधित ग्रामदक्षता समितीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही शेगाव तहसीलचे तहसीलदार समाधान सोनवणे ,एडी डाबेराव तलाठी सगोडा, टीव्ही वानखडे तलाठी भोनगाव, मोरे तलाठी पहुरपूर्णा, संतोष सातभाकरे वाहन चालक व प्रवीण तायडे कोतवाल यांनी संयुक्तरित्या केलेली आहे,

" सध्या स्थितीत मध्ये शेगाव तालुक्यात कोणत्याच रेती घाटाचा लिलाव झालेला नाही किंवा शासनामार्फत कुठल्याच ठिकाणी वाळू विक्री सुरू झालेली नाही करिता नागरिकांनी वाळू विकत घेताना प्रमाणित रॉयल्टी असल्याशिवाय वाळू विकत घेऊ नये याबाबत शासनास सहकार्य करावे असे आवाहन समाधान सोनवणे तहसीलदार शेगाव यांनी केलेले आहे"

Post a Comment

0 Comments