रिसोड तालुक्यातील कोयाळी जाधव या गावी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 366 व्या जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कोयाळी येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये .महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिव किर्तनकार ह.भ.प डॉ. प्रविण महाराज दुशिंग पाटील यांनी आपले विचार मांडताना छत्रपती संभाजी महाराज हे मराठा इतिहासातील एक आदर्श राजा होते. त्यांच्या प्रेरणेतून युवा वर्गानी आदर्श घ्यावा. संभाजी महाराजांचा पूर्ण जीवनपट जनतेसमोर मांडला . महाराजांनी एकही लढाईत हार मानली नाही किंवा तह केला नाही. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे प्रजेच्या अस्मितेसाठी व समतेसाठी आणि मानवतेसाठी प्रेरणादायी ठरते. छत्रपती संभाजी महाराज एक आदर्श आणि पराक्रमी राजा होते . छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण या ग्रंथात एक क्रांतिकारी विचार ते आम्हाला सांगतात की जे लोक प्रयत्नवादी असतात , ती कर्तृत्व सिद्ध करतात व ती लोक दैववादी असतात. कीर्तनात प्रवीण महाराज दुशिंग पाटील म्हणाले जगावे कसे, लढावे कसे, मरावे कसे या तीन प्रकारचे उत्तर फक्त आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यतुुन दिसून येतात.म्हणून म्हणावे लागते दुश्मनांचा कर्दनकाळ होता, वाघाचा ठसा होता, अरे विचारा सह्याद्रीला माझा शंभूराजा कसा होता.... शिवकीर्तन प्रसंगी किर्तनात ह.भ.प डॉ प्रवीण महाराज दुशिंग यांनी विचार मांडले.कार्यक्रमाचे आयोजन करते शिवराजे मित्र मंडळ कोयाळी जाधव.
0 Comments