मिरज भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद नवी दिल्ली यांचे डायरेक्टर अकिल अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली उर्दू भाषेचा विकास व प्रचार हेतू फिरत्या ग्रंथालयाचे 28 मे रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत चाँद उर्दू स्कूल मिरज येथे आगमन होणार आहे. फिरत्या ग्रंथालयाचे संयोजक मोहम्मद ताहिर सिद्दीकी यांनी सांगितले की हे फिरते ग्रंथालय भारतभर भ्रमण करत 28 मे रोजी मिरजेत पोहचणार आहे पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री या मध्ये असणार आहे वाचन संस्कृती वाढावी याचा हा मुख्य उद्देश आहे एका छताखाली अनेक पुस्तके असणार आहेत वाचकांन साठी हि सुवर्ण संधी आहे कमी किमतीत सर्व पुस्तके उपलब्ध होणार आहेत.*
अॅडमिनीस्ट्रेटर ऑफिसर मा. अंजूम बागवान मॅडम व चाँद उर्दू हायस्कूल च्या मुख्य.तबस्सुम पालेगार यांनी मिरज, सांगलीकरांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे
0 Comments