दैनिक सेवाशक्ति टाईम्स चे वृत्त संपादक अभ्यासू युवा पत्रकार फिरोजशाह यांना तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य व दैनिक सेवाशक्ती टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमानाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार जाहीर यांच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त व तथागत ग्रुप संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांच्या वाढदिवसानिमित्त मानाचा असा महामानव, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.
फिरोजशाह हे वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील एका खेड्यातून येतात यांचे सामाजिक,शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, पर्यावरण, साहित्य, धार्मिक, क्रीडा व कृषी आदी क्षेत्रातील अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने लिखाण केले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी शोषित, पीडित, उपेक्षित, वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. याआधी देखील त्यांना दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे जळगाव येथे नामांकित संस्थेने विदर्भ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले तर दैनिक मेहकर टाइम्स व दैनिक विश्व जगत या वृत्तपत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांना समर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दि.४ जून रविवार रोजी सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर जिल्हा बुलडाणा येथे भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व जाहीर सत्कार कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
फिरोज यांनी केलेली कार्य समाजासाठी मार्गदर्शक ठरले असून समाजासाठी अत्यंत भूषणावह आहे. त्यामुळेच फिरोजशाह यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देताना मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष संदिप गवई व प्रदेशाध्यक्ष तथा दैनिक सेवाशक्ती टाईम्सचे मुख्य संपादक अंकोश राठोड यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाज भूषण पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवर असणार असून या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
0 Comments